नाशिक : फूल बाजारात पाणी पिताना एकाकडून नळ तुटल्याने सराफ दुकानदाराने पाइपने मारहाण करीत जखमी केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्वरूप ऊर्फ सनी शरद बोडके
(२७, आसराची वेस) यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी (दि.२४) सकाळी दहाच्या सुमारास फूल बाजारात अनुराधा आर्ट ज्वेलरी दुकानासमोर नळासमोर पाणी पिण्यासाठी गेला असता, नळाचा पाइप तुटला. त्यामुळे दुकानाच्या
सुरक्षा रक्षकाने ही बाब दुकानाचे मालकाला कळविली. दुकानाचे मालक व त्याचा भाऊ आणि मुलगा तेथे आले त्यांनी शिवीगाळ करीत, लोखंडी पाइपने मारहाण केली. त्यात डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ हात चिरून
दुखापत झाली.