पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास
नाशिक : काठे गल्ली भागातील माणेकशानगर येथे चोरट्यांनी ५५ ग्रॅम सोन्यासह पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. समीर अशोक तोरसकर यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. समीर अशोक तोरसकर (४६) त्यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवार (दि.२५) त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे लॅच चोरट्याने तोडून घरात प्रवेश करीत घरातील लॉकर तोडून लॉकरमधील १० हजाराची रोकड, ३० ग्रॅम वजनाच्या सोन्याचे मंगळसूत्र असलेल्या वाट्या, दहा ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ६ ग्रॅमचे सोन्याचे झुमके, चार ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅमचे सोन्याचे पेडल असा ५५ ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरुन नेला.
—
चेहेडी पंपिंग भागात घरफोडी
नाशिक : चेहेडी पंपिंग स्टेशन परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी दीड लाखांचा ऐवज लंपास केला. शशिकांत विष्णूपंत गायखे (४०) हे भगवा चौकातील आदेश अपार्टमेंट येथे रहायला आहे. शुक्रवारी (दि.२५) साडे बाराच्या सुमारास त्यांच्या बंद घराच्या बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दरवाजे वाकवून १५ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, १५ ग्रॅमचे सोन्याचे ओम पान, ३ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १ ग्रॅमच्या सोन्याच्या बाळ्या, १ ग्रॅमची सोन्याची नथ, असा दीड लाखांचा ऐवज चोरुन नेला.
—
भाभानगर परिसरात लाखांची घरफोडी
नाशिक : भाभानगर परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलसमोर आयेशा रेसिडेन्सी परिसरात चोरट्यांनी रात्रीतून घरफोडी करीत लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शाबाद निहाल शेख (२६) यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (दि.२५) साडे दहाच्या सुमारास शाबाद घराला कुलूप लावून बाहेर गेले. त्यानंतर दुपारी घरी परत आले तेव्हा चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी घरातील हॉलमधील प्लायवूडच्या कपाटातील १ लाख रुपये चोरुन नेले.