क्रेनच्या धडकेत महिलेचा मृत्यु
नाशिक – मुंबई नाका परिरातील युनिटी कॉम्प्लेक्स समोर गुरुवारी क्रेनच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. शाहीन शौकत इनामदार (वय ३८) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरण महिलेचे पती शौकत रशीद इनामदार (वय ४५, लक्ष्मी नारायण अपार्टमेंट सह्याद्री हॉस्पीटलमागे जय नगर पखाल रोड) यांच्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलिस ठाण्यात क्रेन चालक कैलासनाथ रामनरेश शुक्ला (वय ४०, हिंदुस्थान क्रेन आझादनगर,वडाळा नाका) यांच्या विरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शौकत इमानदार यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी (ता.२४) दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या पत्नी शाहीन इनामदार या मुंबई नाका सर्कल येथून पायी चालत जयनगरला घरी येत असतांना क्रेन (एमएच १५ सीव्ही २३५५) हिच्यावरील चालक कैलासनाथ शुक्ला यांच्या निष्काळजीपणामुळे क्रेनची महिलेला धडक बसली त्यात, अंगावरुन क्रेन गेल्याने महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
…..
सुनेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या विरोधात गुन्हा
नाशिक – सुनेला थायराईड असल्याने तिला मूलबाळ होणार नाही असा गैरसमजातून छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. एकनाथ विठ्ठल शिंदे (सासरे), सिमा (सासु), अमित (पती) सुमीत (दीर) मोड, (तळोदा जि. नंदुरबार) अशी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या मंडळीची नाव आहेत. तक्रारीनुसार, ५ फेब्रूवारी २०१८ ते १७ जून २०२१ दरम्यान वेळोवेळी सासरच्या मंडळीनी तक्रारदारांची मुलीला थाईरॉईड असल्याने ती गर्भवती राहू शकत नाही. असा गैरसमज करुन घेत सासरच्या मंडळीनी टोमणे मांरुन बोलणे शरीरीक व मानसिक त्रास देउन आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
….