गंजमाळला वाहनाच्या धडकेत मृत्यु
नाशिक – गंजमाळ परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. शनिवारी (ता.१९) दुपारी तीनला यात्री हॉटेल परिसरातील स्मार्ट आर्ट रेडीयम समोर हा अपघात घडला. यात साधारण ६० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र मृताची ओळख पटलेली नाही. पोलीस नाईक नरेंद्र दादा जाधव (वय ५२) यांच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलीस ठाण्यात अपघातांची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी १९ जूनला दुपारी तीनला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात नागरिकाच्या खांद्याला व बरगडीला गंभीर दुखापत झाली याप्रकरणी निष्काळजीपणाने वाहन चालवून एकाच्या मरणास कारणीभूत होउन फरार झाल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
……