नाशिक – भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या कन्येस केवायसी अपडेटच्या बहाण्याने एका भामट्याने बँक खात्यातून ३४ हजार ८११ रुपये परस्पर काढून घेत गंडा घातला आहे. या प्रकरणी सायली सुहास फरांदे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहे. सायली यांनी या फसवणुकीबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १९ जून रोजी सकाळी ९.३० ते १०.१५ दरम्यान एक फोन आला. त्यात एअरटेल मधून बोलत असल्याचे फोनवरुन सांगितले गेले. त्यानंतर या भामट्याने सीमकार्ड सुरु ठेवण्यासाठी केवायसी अपडेट करावे लागेल असे सांगून सायली यांना अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर विश्वास संपादन करुन ओटीपी क्रमांक भामट्याने मागितला. या ओटीपीच्या आधारे भामट्याने सायली यांच्या गंगापूर रोडवरील अॅक्सीस बँक खात्यातून ३४ हजार ८११ रुपये परस्पर काढून घेतले.
अॅानलाईन फसवणुकीच्या घटना सगळीकडे वाढल्याआहे. त्यामुळे त्यात होणारी फसगत सहसा लक्षात येत नाही. कोणतेही कारण काढून समोरचे विश्वास संपादन करुन हे आॅनलाईन पैसे परस्पर लंपास करतात. त्यामुळे अशा घटनेमुळे सायबर क्राईम ब्रॅन्चचे काम वाढले आहे.