लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार
नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरूणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयीताने मारहाण करीत लग्नास नकार दिल्याने व अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत अरूण जाधव (३० रा.शकुंतला अपा.सागर स्विट जवळ अशोका मार्ग) असे संशयीताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीत आणि पीडिता यांच्यात मैत्रीचे संबध होते. काही दिवसांनी त्यात प्रेमाचे रूपांतर झाले. संशयीताने पीडितेस लग्नाचे आमिष दाखविले. ६ फेब्रुवारी २०१८ ते १८ जून २०२१ दरम्यान संशयीताने लग्नाचे आमिष दाखवून आपल्या घरी पीडितेस घेवून जात वेळोवेळी बलात्कार केला. युवतीने लग्नाचा तगादा लावला असता संशयीताने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच यावेळी त्याने पिडीतेचे अश्लिल फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने युवतीने पोलीस ठाणे गाठले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक साजिद मन्सुरी करीत आहेत.
……