पंजाबी कॉलनीत घरांवर दगडफेक
नाशिक -मुलीस पळवण्यास मदत केल्याच्या संशयावरून दहा जणांच्या टोळक्याने पंजाब कॉलनीत एका घरावर दगडफेक करून काचा फोडल्या तसेच वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत पसरवल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. अभिनव गोपाळ कुर्हे, विशाल चाफळकर, प्रकाश राजेंद्र पगारे, आकाश इंगळे, विकी वरखेडे, गोपाळ कुर्हे, अजय साळुंके, व त्यांचे तीन साथीदार अशी तोडफोड करणार्या संशयितांची नावे आहेत. यातील तीघांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी मिनल भगवान बोरनारे (रा. पंजाबी कॉलनी, नाशिकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बोरनारे यांच्या भावाने संशयितांच्या घरातील मुलीस पळवुन नेहण्यास मदत केली या संशयावरून त्यांनी बोरनारे यांच्या घरावर लाथा मारून दगडफेक करून खिडक्यांचा काचा फोडल्या. तसेच घराबाहेर उभ्या असणार्या वाहनांची तोडफोड केली. तसेच हातात कोयते, लाठ्या काठ्या मिरवत परिसरातील नागरीकांवर दहशत बसवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास सहायक निरिक्षक परदेशी करत आहेत.
……