अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नाशिक : घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा नातेवाईक तरूणाने विनयभंग केल्याची घटना फुलेनगर भागात घडली. संशयीतास पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज सुरेश शिंदे (२० रा.मच्छीबाजार जवळ,फुलेनगर) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आजीने तक्रार दाखल केली आहे. संशयीत आणि पीडित मुलगी एकमेकांची नातेवाईक आहेत. सोमवारी (दि.२१) मुलगी घरात एकटी झोपलेली असल्याची संधीं साधत त्याने घरात जावून विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
….