तोतया पोलीसांचा वृद्धला गंडा
नाशिक – पोलीस असल्याची बतावणी करत भामट्यांनी वृद्धाला २९ हजार रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी दुपारी आडगावनाका उड्डाणपुलाखाली घडला. याप्रकरणी धिरजभाई पोपटभाई गोहिल (६८, रा. सेवाकुंज, निमाणी, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गोहिल हे शनिवारी दुपारी महामार्ग क्रॉस करत असताना दुचाकीवरून तेथे आलेल्या दोघांनी त्यांना पुढे पोलीस तपासणी सुरू असून तुमच्या पिशवीत गांजा असल्याची माहिती मिळाली आहे. असे सांगत पिशवीची तपासणी केली. तर खिशातील पाकिट, सोन्याची अंगठी या वस्तु काढून घेत त्या पिशवीत ठेवल्याचे भासवून लंपास केल्या. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक वाय.एस. माळी करत आहेत.
……