सव्वापाच लाखाची घरफोडी
नाशिक – बंद घराचा दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्यांनी बेडरूम मधील लाकडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या चांदिचे दागिणे व रोकड असा ५ लाख २३ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना चेहडी पंपिंग स्टेशन परिसरात शनिवारी (दि.१९) उघडकीस आली. याप्रकरणी जया सुरेश भोईर (रा. निवारा दर्शन रो हाऊस, चेहडी पंपिंग स्टेशन, नाकिशरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार भोईर कुटुंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी १४ ते १९ जून दरम्यान बंद घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे गंठण, पोत, असे विविध दागिणे व रोकड असा ५ लाख २३ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक जाधव करत आहेत.
…..