मारहाण करत महिलेचा विनयभंग
नाशिक – दारू पिऊन महिलेच्या घरी जात वाद करून महिलेस व तीच्या पती तसेच मुलांना मारहाण करत कपडे फाडून महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.१८) रात्री पेठरोडला दत्तनगर परिसरात घडली. गणेश भानुदास धात्रक (२७, रा. दत्तनगर, पेठरोड, पंचवटी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित धात्रक हा दारू पिऊन रात्री नऊ वाजेच्या सुमारास पीडितेच्या घरी आला. चांदिच्या चैन व छत्री मागितल्याच्या कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ केली. पती तसेच मुलांना हाताने मारहाण केली. तसेच पीडिता समजवण्याचा प्रयत्न करत असताना तीला मारहाण करून अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक वाय.एस. माळी करत आहेत.
…..