महिलेचा विनयभंग
नाशिक – घर भाडेतत्वावर दिले नाही या रागातून मावशीच्या जावयाने महिलेस मारहाण करत तीचे कपडे फाडून विनयभंग केल्याची घटना मंगळवारी (दि.१५) पेठरोड परिसरात घडली. पंकज संजय सावंत (रा. गजवक्र नगर, अश्विमेधनगर) असें गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित हा पीडित महिलेच्या मावशीचा जावई आहे. त्याला भाडे कराराने हवे असलेले घर पीडितेने दिले नाही. या रागातून त्याने भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या पीडित महिलेचा बाजारात हात पिरगळला तसेच पाठलाग करून अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार संशयित सावंत यावर विनयभंगाचा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक गवळी करत आहेत.
…..
हॉटेलमध्ये युवकाची आत्महत्या
नाशिक – सातपूर येथील एका हॉटेलमध्ये २७ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१८) सकाळी उघडकीस आला आहे. साई प्रसाद मुळे (रा. सातपुर) असे या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार क्विटर पॉइंट येथील हॉटेल संतोष येथे साईप्रसाद याने शुक्रवारी सकाळी इलेक्ट्रीकच्या वायरला कापडाच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी सापतूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक सय्यद करत आहेत.
…..