नोकराकडून दीड लाख चोरीचा बनाव
नाशिक – बँकेत भरणार करण्यासाठी मालकाने दिलेली दीड लाखाची रक्कम दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा बनाव करत दीड लाखाचा अपहार केल्याचा प्रकार पंचवटीतील सेवाकुंज परिसरात उघडकीस आला आहे. भगवान एकनाथ वाघ (५२, रा. दामोदरनगर, हिरावाडी, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी आनंद सुभाष नागसेठी (४०, रा. नगासेठी भवन. सेवाकुंज, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित वाघ हा नागसेठी यांच्याकडे नोकर म्हणुन कार्यरत आहे. नागसेठीया यांनी शुक्रवारी (दि.१८) सकाळी आकारा वाजता नागसेठिया ट्रेडिंग कंपनी या व्यावयासायातील दीड लाख रूपयांची रक्कम पंचवटी येथील कोटक महिंद्रा बँकेत भरणा करण्यासाठी दिली होती. परंतु भरणा करण्यासाठी जात असताना हेल्मेटधारी दोन दुचाकीस्वरांनी अंगावर लाल रंग टाकून रक्कम पळवल्याचा बनाव केला. तसेच सदर रकमेचा अपहार केला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक यु. आर. गवळी करीत आहेत.
……
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिक – भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.१७) सायंकाळी अवडाळागाव चौफुली येथे घडली. शैलेंद्र बाळू पवार (३१, रा. विजय नगर, नाशिकरोड) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी डंपर चालक मोहमंद साजीद अन्सारी (रा. झारखंड) यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच ४६ बीएफ ९६४६ या क्रमांकाचा डंपर अन्सारी भरधाव चालवत होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एमएच ०५ सीएस ५१७२ क्रमांकाच्या दुचाकीस धडक दिली. त्यात दुचाकीस्वार शैलेंद्र पवार यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अन्सारी यास अटक केली आहे.
……