इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
यवतमाळ जिल्ह्यात मुख्याध्यापिकेने तिच्या शिक्षण पतीला विष देऊन मारुन मृतदेह जंगलामध्ये निर्जनस्थळी अर्धवट स्वरुपात जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शंतनू देशमुख (३२, रा. सुयोगनगर) या शिक्षकाचा तिच्या पत्नी मुख्याध्यापिका असलेल्या निधी शंतनू यांनी खून केला.
१५ मे रोजी यवतमाळ शहरालगतच्या चौसाळा जंगलात शंतनू देशमुख यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. विदयार्थ्यांना हाताशी घेऊन मुख्याध्यापिका निधीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
शंतनू आणि निधी यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यामुळे हे दोघेही आई -वडिलांपासून विभक्त राहत होते. सनराईज इंग्लिश स्कुलमध्ये दोघेही कामाला होते. पण, शंतनू दारुच्या आहारी गेल्यामुळे त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी निधीने हत्येचा कट रचला.