इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात प्रेम विवाह केल्याच्या रागातून वडिलांनी आपली मुलगी आणि जावई यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात मुलीचा मृत्यू झाला तर जावई गंभीररित्या जखमी आहे. या घटनेनंतर संतप्त लोकांनी गोळीबार करणा-या मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली.
गोळीबार करणारे मुलीचे वडिल हे सीआरएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले हे आहे. त्यांनी आपली मुलगी तृप्ती मागले यांच्यावर गोळीबार केला तर जावई अविनाश वाघ हे गंभीर जखमी झाले आहे. वर्षभरापूर्वी तृप्ती व अविनाशने प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते चोपडा येथे अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी आले होते. याची माहिती मिळताच किरण मांगले चोपडयात आले. त्यानंतर ते लग्नस्थळी गेले. येथे त्यांनी आपल्या जवळील बंदुकीने गोळ्या झाडल्या.
या घटनेत आणखी एक महिला जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक डॅा. महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले.