अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नाशिक : मजुरीच्या कामावर असताना अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार पाथर्डी गाव येथे घडला. कांतीलाल हरी गवळी (रा. कासोली, ता. त्र्यंकेश्वर) असे संशिताचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी बांधकाम मजुरी करत असताना संशयिताने तिच्याशी ओळख वाढवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले.यातून ती गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
……
टोळक्याची दहशत, जबरी लूट
नाशिक : चौघांच्या टोळक्याने कारच्या काचा फोडून दहशत पसरवली. तसेच एकाच्या पोटास चाकू लावून पैसे काढून घेत जबरी लूट केल्याची घटना नाशिकरोडच्या जगताप मळा परिसरात घडली.सत्यम ढेनवल, रोहन राठोड, शुभम बेन वाल, राहुल उजैनवाल अशी संशयितांची नावे आहेत. गुरुवारी दुपारी परिसरात आरडाओरड करून दहशत माजवली. तर जय गोडसे यांच्या करची काच फोडली. तसेच अमोल कुमावत याच्या पोटास चाकू लावून दारुसाठी खिशातून ५०० रुपये काढून घेतले.याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…..