नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नंदुरबार येथून जवळ असलेल्या गुजरात सीमेलगतच्या हॅाटेल हायवेवर पोलिसांनी रेड टाकून चार पश्चिम बंगाल व इतर भागातील मुलींची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी चार जणांना अटक केली असून यात तीन जण हे नाशिकचे आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये हॅाटेल मालक संजय ब्रिजलाल चौधरी, रा. नंदुरबार यांच्या सह योगेश कैलास अभाडे, रा. पठारे, ता. सिन्नर, मंगेश अशोकराव शेजूळ, पंचवटी, नाशिक, महेश पांडुरंग काळवांडे अमृतधाम, नाशिक यांचा समावेश आहे.
पोलिसांना तीन इसम काही महिलांसोबत हॅाटेलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









