त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील ब्राम्हणवाडे गावात किरकोळ वादातून टोळक्याने युवकावर कोयता व कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रभाकर कालेकर असे हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्रीच्या सुमारास गावातच आठ ते नऊ जणांनी हा हल्ला केला. त्यानंतर त्याच्या स्विफ्ट डिझायर कारची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्यानंतर गावात भीतीचे वातावरण असून परिसर हादरला आहे. दरम्यान या घटनेनंतर गावक-यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.