नाशिक : व्यवसायासाठी माहेरून सात कोटी रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहीतेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत एकाने सोशलमिडीयावर अश्लिल संदेश पाठवून महिलेची बदनामी केली तर दुस-याने वाहन शिकवितांनी पीडितेचा विनयभंग केला. याप्रकरणी मुंबईच्या चार संशयितांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको भागात राहणा-या महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सन.२०१८ ते २०२१ दरम्यान विवाहीता मुंबई येथे सासरच्या मंडळीबरोबर वास्तव्यास होती. या काळात पतीने तू सुंदर दिसत नाही तसेच व्यवसायासाठी माहेरून व नातेवाईकांकडून एक मिलीयन डॉलर (सात कोटी रूपये) आणावेत या मागणीसाठी तिचा मानसिक व शारिरीक छळ केला गेला. तर संशयितांपैकी एकाने वाहन शिकविण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला तर दुस-याने अश्लिल संदेश इस्टाग्राम या सोशल साईटवर प्रकाशीत करून महिलेची बदनामी केल्याचे म्हटले आहे. या घटनेत महिलेच्या अलंकारांचा संशयितांनी अपहार केला असून अधिक तपास निरीक्षक निंबाळकर करीत आहेत.
दोन महिलांचा विनयभंग; परस्परविरोधी गुन्हे दाखल
नाशिक : दोन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकमेकांच्या शेजारी राहणा-या दोन कुटूंबियांमध्ये झालेला वाद हातापायीवर गेल्याने हाणामारी झाली त्यात ही घटना घडली.
पहिल्या पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शेजारी राहणा-या कुटुंबियांनी अश्लिल शिवागाळ केल्याने शुक्रवारी (दि.२४) सायंकाळच्या वेळी जाब विचारण्यासाठी गेली असता पुरूषाने विनयभंग केला तर दोघांनी हाताच्या चापटीने मारहाण केल्याचे म्हटले आहे. दुस-या पीडितेने म्हटले आहे की, शेजारी राहणा-या महिलेने पीडितेच्या पतीस शिवीगाळ करीत तिला मारहाण केली. या घटनेत सदर महिलेच्या पतीने विनयभंग केला तर त्यांच्या वाहनचालकानेही मारहाण केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी परस्पविरोधी विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला उपनिरीक्षक एस.सी.बारेला व एम.एस.शिंदे करीत आहेत.