नाशिक : पायी जाणाऱ्या युवकाला रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने मारहाण केल्याची घटना भद्रकालीतील खंडोबा चौकात घडली. गुफरान राजू सय्यद व रिक्षाचालकाविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकला जाधव (रा. खंडोबा चौक, भद्रकाली) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा आकाश हा शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास खंडोबा चौकातून पायी जात असताना रिक्षाचालक (एमएच १५ एफयु ५२९६) व त्याचा साथीदार गुफरान याने त्यास शिवीगाळ करीत काहीतरी वस्तूच्या सहाय्याने मारून जखमी केले.