नाशिक : मानूरगावात गोडावून मधून चोरट्यांनी तब्बल अडीच लाख रूपये किमतीचे ४० ऑईलचे ड्रम चोरून नेले आहे. संजय जगदेव यादव (रा.तपोवन) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑईल विक्रेते यांचे मानूर गावात महाराष्ट्र ऑईल सेंटर नावाचे दुकान असून त्याच ठिकाणी गोडावून आहे. अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी (दि.१४) रात्री गोडावून फोडून ऑईलने भरलेले सुमारे २२० लिटरचे २ लाख ४० हजार रूपये किमतीचे ४० ड्रम चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.