नाशिक : शिवाजीनगर भागात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ६३ वर्षीय पादचारी वृध्द ठार झाल्याची घटना घडली. प्रदिप प्रभाकर नाईकवाडी (६३ रा. ऑडिटर कॉलनी,शिवाजीनगर) असे मृत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली आहे. नाईकवाडी ३१ मे रोजी रात्री परिसरात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली होती. शिवाजीनगर येथील दत्तमंदिर समोर ते रस्ता ओलांडत असतांना समोरून भरधाव आलेल्या दुचाकीने (एमएच १५ एफझेड ३७०३) त्यांना जोरदार धडक दिली होती. याअपघातात नाईकवाडी गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर दुचाकीस्वार आपल्या वाहनासह पसार झाला असून मृताचा भाऊ विनोद नाईकवाडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपघाताची नोंद कराण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.