भरदिवसा चोरट्यांनी रोकडसह सुमारे दोन लाखाचा ऐवज केला लंपास
नाशिक : टेरेसच्या उघड्या दारातून प्रवेश करीत चोरट्यांनी रोकडसह सुमारे दोन लाखाच्या ऐवज लंपास केला आहे. सिडकोत भरदिवसा ही धाडसी चोरी करण्यात आली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद पुरूषोत्तम दक्षीणी (रा.जिजाई बंगला,अश्विननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दक्षीणी कुटूंबिय बुधवारी (दि.१५) आपल्या घरात असतांना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या दुसºया मजल्यावरील टेरेसच्या उघड्या दारातून प्रवेश करीत बेडरूममधील कपाटातून एक हजाराच्या रोकडसह दागिणे असा १ लाख ८९ हजाराच्या अलंकारांवर डल्ला मारला. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
मॉलच्या आवारातील लोखंडी ढापे चोरीला
नाशिक : महामार्गावरील आडगाव शिवारात डी मार्ट या नामांकित मॉलच्या आवारातील लोखंडी ढापे चोरट्यांनी चोरून नेले. २५ हजार रूपये किमतीचे हे ढापे होते. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल गजानन पवार (रा.कोणार्क नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवार आडगाव येथील डीमार्ट मॉलचे काम बघताता. बुधवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास मॉल सुरक्षेस छेद देत चोरट्यांनी आवारातील लोखंडी पट्यांचे जाळीचे २२ ढापे चोरून नेले. अधिक तपास जमादार अरूण पाटील करीत आहेत.