नाशिक : शिवाजीनगर परिसरातील मारूती मंदिर भागात पूर्ववैमनस्यातून घरी आलेल्या पुतण्यास घरमालक व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत पुतण्या जखमी झाला असून त्याच्या अटोरिक्षासह टोळक्याने संसारोपयोगी वस्तूंची तोडफोड केल्याने मोठे नुकसान झाले आहे. वसिम नसिर शेख (२८ रा.शिवाजीनगर,सातपूर) याने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रोशन पगारे व त्याचे दोन तीन साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. काका नजीर शेख (रा.शुभम अपा.) यांच्या घरी वाढदिवसानिमित्त वासिम गेला असता ही घटना घडली. शेख कुटुंबिय वाढदिवस साजरा करीत असतांना घरमालक असलेला संशयित रोशन पगारे आपल्या दोन ते तीन साथीदारांसह तेथे आला. बेकायदा घरात शिरत त्याने जुन्या वादातून नजीर शेख यांचा पुतण्यास वसिम शेख यांस शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यावेळी संतप्त टोळक्याने घरातील सामानासह शेख यांची घराबाहेर लावलेल्या एमएच १५ – ५६३३ या अॅटोरिक्षास लक्ष करून नुकसान केले. अधिक तपास पोलिस नाईक गणेश हिंडे करीत आहेत.