अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नाशिकः अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तीच्यावर अत्याचार करून तीस गर्भवती केल्याप्रकरणी एकावर पोस्कोसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुनील मोदिराम ठाकरे (२७, रा. मातोश्री पार्क, श्रमिकनगर, सातपुर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असून पोलीसांनी त्यास अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताने श्रमिकनगर परिरात राहणार्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तीच्यावर ९ जानेवारी २०२१ रोजी बळजबरी अत्याचार केले. यातून ती गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. याप्रकरणी सातपुर पोलीसांनी संशयितास अटक केली असून त्यावर बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक एस. व्ही. पाटील करत आहेत.
…..