नाशिक : अंबड लिंक रोड ते पवननगर मार्गावर रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. पाथर्डी फाटा येथील आयोध्या कॅालनी येथील शशिकला सोन्याबापू वाघ या महिलेने या चोरीची तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केली आहे. वाघ या सोमवारी अंबड लिंकरोडने पवननगरच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. सदगुरू हॉटेलकडून पवननगर बसथांबाच्या दिशेने त्या जात असतांना समोरून दुचाकीवरून आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे ४० हजार रूपये किमतीचे पँडल असलेली सोनसाखळी ओरबाडून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक कातकाडे करीत आहेत.