नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. सुखदेव चंद्रमोरे असे मृत कैद्याचे नाव आहे. चंद्रमोरे यांना शुक्रवारी सायंकाळी अचानक श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने जेलप्रशासनाने त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतांना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जेल रक्षक गणेश नागरे यांनी जिल्हा रूग्णालयात त्यांना दाखल केले होते. अधिक तपास उफनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
बसप्रवासात प्रवाश्याने पाठीस लावलेल्या बॅगेतून चोरट्यांनी लॅपटॉप केला लंपास
नाशिक : गडकरी सिग्नल ते ठक्कर बाजार दरम्यान बसप्रवासात एका प्रवाश्याच्या पाठीस लावलेल्या बॅगेतून चोरट्यांनी लॅपटॉप लंपास केला. या चोरीप्रकरणी प्रशांत तुळशीराम पाटील (रा.चिंचवड,पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील शनिवारी कामानिमित्त शहरात आले होते. ठक्कर बाजार बसस्थानकात उतरण्यासाठी ते बसच्या दारात उभे राहिले असता ही घटना घडली. यावेळी बहुतांश प्रवाशी दारात उभे असतांना ते गर्दीत थांबले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पाठीस लावलेल्या सॅग मधील सुमारे १५ हजार रूपये किमतीचा लॅपटॉप हातोहात लांबविला. अधिक तपास पोलिस नाईक साबळे करीत आहेत.