नाशिक : चायनीज खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणा-या कैलास बाबुराव साबळे वय (४५) वर्ष यांचे राहते घरी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना डॉ. हेडगेवार नगर त्रिमूर्ती चौक परिसरात घडली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे. त्यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिस पुढील तपास करणार आहे. साबळे यांचा कॅनडा कॉर्नर परिसरात परिसरात चायनीज गाडी लावत होते. रात्री उशिरापर्यंत त्यांना मित्रांनी घरी पोहोचविले होते. साबळे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्या जखमेवर हळद लावली होती. रात्री घरी आल्यानंतर ते झोपी गेले. सकाळी दहा वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांच्यासह अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन भेट घेतली. त्यानंतर अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे .