नाशिक – व्दारका येथील बेला पेट्रोलपंपावर पंपचालकाच्या केबीनमध्ये घूसून २७ हजाराचे नोटांचे बंडल एकाने लंपास केले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पेट्रोलपंप व्यवस्थापक कुमार प्रभूदास गोलानी (वय ५१, निशान पार्क, आश्विनीनगर सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. बेला पेट्रोलपंपावर शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास पेट्रोलपंप चालकाच्या केबीनमध्ये घूसून एकाने ६० रुपयांचे इंजिन ऑईलची बाटली घेतली. हे घेत असतांना काउंटरमधील २ हजाराचे व पाचशे रुपयांचे बंडल घेत त्यात दोनशे रुपयांपेक्षा भारतातील मोठी नोट कोणती असे विचारत तेथील २७ हजाराचे बंडल लंपास केले.