.नाशिक – महिलेला शिवीगाळ करीत तिला विनयभंग केल्याची घटना सातपूरला जाधव पार्क परिसरात घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री आठच्या सुमारास एकाने महिलेला शिवीगाळ केली. त्यामुळे महिला तिच्या पतीला फोन करण्यासाठी घरात जात असतांना संशयिताने महिलेला मारहाण करीत तिच्याशी अंगलट केली. या घटनेनंतर सातपूर पोलिस स्थानकात महिलेने तक्रार केली. यात संशयिताच्या भावाने शिवीगाळ करीत विनयभंग व मारहाणीला प्रोत्साहान दिले असल्याचे म्हटले आहे. सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.