नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातील नरहरीनगर भागात बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाखाचा ऐवज लंपास केला. त्यात ४३ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज सुनिल शिरवले (रा.श्रीराज अपा.अंजना लॉन्ससमोर) यांनी तक्रार दाखल केली आहे. शिरवले कुटूंबिय ६ ते ९ जून दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ ला्र ९१ हजार १०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सय्यद करीत आहेत.