नाशिक : सिडकोत मुलाशी फारकत झालेली असतांना सासूच्या घरावर सुनेने कब्जा केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर गृहप्रवेश करीत सुनेने घर बळकावल्याचा दावा सासूने केला आहे. विद्या विरया हिरेमठ (रा.गुलबर्गा,कर्नाटक) असे संशयित सुनेचे नाव आहे. याप्रकरणी पुष्पलता दशपुत्रे (रा.पाटीलनगर,त्रिमुर्तीचौक) यांनी तक्रार दाखल केली आहे. दशपुत्रे यांनी आपल्या तक्रारीत, मुलाशी संशयित महिलेचा घटस्फोट झालेला असतांना व तिचा माझ्या घरावर कुठलाही अधिकार नसतांना तिने गेल्या रविवारी सायंकाळी बेकायदेशीर गृहप्रवेश केला. यावेळी संतप्त महिलेने घरावर अधिकार दाखवून वाईट साईट शिवीगाळ व दमदाटी करीत गृह अतिक्रमण केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास पोलिस नाईक देशमुख करीत आहेत.