अमळनेर – नाशिक बसप्रवासात महिलेचे पावणे तीन लाखाचे दागिणे चोरीला
नाशिक : अमळनेर ते नाशिक बसप्रवासात महिलेच्या बॅगेतील पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. पर्समध्ये सुमारे पावणे तीन लाखाचे दागिणे होते. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली विश्वासराव पवार (६७ रा.पातोंडा ता.अमळनेर,जळगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पवार शुक्रवारी शहरातील नातेवाईकांकडे आल्या. पातोंडा येथून त्या बसने प्रवास करीत होत्या. अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग उघडून पर्स चोरून नेली. या पर्स मध्ये सुमारे २ लाख ८७ हजार ५०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे होते. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
नाशिक : महात्मानगर भागात बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ललीत रंबसलाल गुगलानी (रा.कविता अपा.महात्मानगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुगलानी शुक्रवारी (दि.१०) सकाळच्या सुमारास आपल्या घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागून बेशुध्द झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार खुळात करीत आहेत.