नाशिक – नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन गुन्ह्यांतील चार संशयितांना गजाआड केले आहे. पहिल्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार शैलेश गोपीचंद सहारे यास गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळ काढू लागल्याने पोलिसांचा संशय बळावला व अखेर त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकुण ३५ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. संशयिता विरोधात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून पुढील तपास नाशिकरोड पोलिस करत आहेत. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पो.ना. विशाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तर बिटको हॉस्पीटल नाशिकरोड येथील एका डॉक्टरवर हल्ला केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रणव प्रदीप इंगळे वय १८वर्षे रा. म्हाडा बिल्डींग ५१, गांधीधाम देवळाली गाव, उपनगर, शाहीद शौक्त सैय्यद वय १८ वर्षे रा. शेस मंजिल, टाउन हॉल शेजारी, सत्कार पॉईंट, देवळालीगाव नाशिकरोड, यज्ञेश उर्फ मॅडी ज्ञानेश्वर शिंदे वय १९ वर्षे रा. चंदनवाढी, सुभाषरोड नाशिकरोड यांना अटक करण्यात आली आहे. यातील कलाम मन्सुरी रा. गुलाबवाडी मालधक्कारोड, नाशिकरोड हा अद्याप फरार असल्याने त्याचा शोध नाशिकरोड पोलिस घेत आहे. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता, एक मोबाईल फोन व रोख रक्कम जप्त करण्यात आली. सदरची कामगिरी ही वपोनी अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे, गुन्हे शाखेचे पोनी राजु पाचोरकर, सहायक पोलिस निरीक्षक योगेश पाटील, पोउनि जयेश गांगुर्डे, गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोहवा अनिल शिंदे, मनोहर शिंदे, विशाल पाटील, देवरे, संदीप बागल, विष्णु गोसावी, कुंदन राठोड, राकेश बोडके, जाधव, केतन कोकाटे यांनी पार पाडलेली आहे.