नाशिक – पंचवटी भागातील फुलेनगर परिसरात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेत शरीरसंबंधाची मागणी करत महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास दळवी किराणा दुकानासमोर घडली. या प्रकरणी पीडित महिलेने पंचवटी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, पेठ रोड फुलेनगर भागातील दळवी किराणा दुकानासमोर संशयित आरोपी सुनिल जाधव (वय ४०, रा. पाटाजवळ, फुलेनगर, पंचवटी) हा पाठीमागून आला. त्याने हात धरला आणि तू मला आवडतेस असे म्हणून शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. या घटनेनंतर महिला घाबरली. तीने या घटनेची माहिती कुणाला दिली नाही. मात्र गुरुवारी आरोपीने तक्रारदार महिला यांचा मामेभाऊ मोहन जाधव यास मारहाण करुन पीडित महिलेला धमकी दिली. त्यानंतर पीडित महिलेने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली.