नाशिक : महात्मानगर भागात चोरट्यांनी घरफोडून तिजोरीतून रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. प्रमोद गणेश कुमार (रा.कल्पतरू बिल्डींग,इंडियन आॅईल पेट्रोल पंपा मागे) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार कुटुंबिय १९ ते ३१ मे दरम्यान बिहार राज्यातील आपल्या गावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला व बेडरूममधील कपाटातील तिजोरीतून ५ हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.