कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिकः भरधाव कंटेनरने धडक दिल्याने दुचाकी चालक ठार झाल्याची घटना नाशिक पुणे महामार्गावर चिंचोली फाटा येथे सोमवारी (दि.१४) रात्री घडली. जितेंद्र अशोक सोनवणे (३२, रा. गुलमोहर कॉलनी, कामटवाडे शिवार) असे या अपघात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनवणे हे त्यांच्या बजाज दुचाकीवरून सिन्नरकडून नाशिककडे येत होते. यावेळी पाठिमागून भरधाव आलेल्या कंटेनरने जोराची धडक दिली. यामध्ये सोनवणे याच्या हात, डोके व चेहर्यास गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी कंटेनर चालकावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
….
झाडावरून पडून एक ठार
नाशिकः आंबे काढण्यासाठी झाडवर चढलेल्या व्यक्तीचा तोल जाऊन तो संरक्षक भिंतीवर पडून त्याच्या छातीत रॉड घुसल्याने एकाचा मृत्यु झाल्याची घटना गंगापूर रोडच्या सोमेश्वर कॉलनी परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. शिवाजी बापु खैरनार (५३, रा. सोमेश्वर कॉलनी, गंगापूर रोड) असे या घटनेत मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार खैरनार हे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घाराजवळील आंबच्या झाडावर आंबे काढण्यासाठी चढले होते. दरम्यान त्यांचा तोल जाऊन ते खालील संरक्षक भिंतीवर पडले. भिंतील लावलेले लोखंडी रॉड पैकी एक रॉड त्यांच्या छातीत घुसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने बिटको रूग्णालय व पुढे आडगाव मेडिकल रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.