नाशिक – अंबड औद्योगिक वसाहतीत कंपनी उद्योजक नंदु आहेर यांच्या खूनाच्या घटनेनंतर पोलिसांनी ४८ तासात चारही आरोपींना गजाआड केले आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सिमेन्स कंपनी जवळ असलेल्या आहेर इंजिनिअरींग कंपनीच्या प्रवेशद्वारावर चार तरुणांनी नंदु आहेर यांच्यावर तलवारीने डोक्यावर वार करुन ठार केले. या घटनेनंतर पोलिसांनी मंगळवारीच सातपूर काँलनीतील तुळजाई हाँस्पिटल मधून उपचार घेत असतांनाच ताब्यात घेतले होते. या नंतर या घटनेतील दुसरा संशयित आरोपी सिद्धार्थ उर्फ गोलू जगदीश गायकवाड (वय २१) रा. चाळीसगाव याला बुधवारी रात्रीच चाळीसगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली. तर तिसरा आरोपी पियुष अशोक माळोदे (वय १९) रा. मारुती संकुल दत्तनगर व चौथा अल्पवयीन मुलाला गुरुवारी सकाळी दत्तनगर भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले. या चौघांना काल गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या निर्घृणपणे झालेल्या खुनाच्या घटनेनंतर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे व पोलिस उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर, पोलिस निरीक्षक नंदन बगाडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे व पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी यांनी ही कारवाई केली.