तीन दुचाकी चोरीला; देवळाली कॅम्प,अंबड आणि आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : शहरात तीन दुचाकी चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातून चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प,अंबड आणि आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प येथील नवीन स्टेशन भागात राहणारे योगेश रमेश परदेशी हे गेल्या गुरूवारी (दि.२) दुपारच्या सुमारास संसरी नाका भागात गेले होते. रामदेव बाबा दुकानासमोर त्यांनी आपली स्प्लेंडर (एमएच १५ एफएक्स ११०६) पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक भोईर करीत आहेत. दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील जाधव संकुल भागात घडली. मल्लुसिंग धनसिंग राठोड (रा.विठ्ठल अपा.जाधव संकुल) यांची शाईन एमएच १९ डीयू ६६४५ मोटारसायकल बुधवारी (दि.७) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. तर नजीर उस्मान सय्यद (रा.सय्यद पिंप्री) हे सोमवारी (दि.६) रात्री औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लॉन्स भागात गेले होते. सिध्दीविनायक चौकात पार्क केलेली त्यांची एमएच १५ बीबी ५०२५ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक देसाई करीत आहेत.
विषारी औषध सेवन करून दोन आत्महत्या
नाशिक : इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. संबधीताच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कलानगर येथील सिताराम लक्ष्मण जाधव (६७ रा.कलानिकेतन रो हाऊस) यांनी मंगळवारी (दि.७) सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात किटकनाशक विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच त्यांना तातडीने नजीकच्या लाईफ केअर रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना चार्वाक चौक नजीक घडली. कैलास धोंडू सोनवणे (५२ रा.पाटील गार्डन) यांनी बुधवारी (दि.८) सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी किटक नाशक औषध सेवन केले होते. पत्नी निर्मला सोनवणे यांनी त्यांना तातडीने लाईफ केअर हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. दोन्हीही घटनांप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खरोटे करीत आहेत.