नाशिक : बिटको कॉलेज परिसरात कौटूंबिक न्यायालयात दाखल केलेली केस मागे घ्यावी या कारणातून जावयाने आपल्या साथीदाराच्या मदतीने सास-यास बेदम मारहाण केली. सुकदेव सोपान घुगे (३२) व पंढरीनाथ घुगे (३५ रा.पिंपरी लावकी – अजमपुर ता.संगमनेर) अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. या घटनेत सासरा जखमी झाला असून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रामदास दादा गिते (रा.खर्जुल मळा,सिन्नरफाटा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार गिते हे संशयित सुकदेव घुगे यांचे सासरे आहेत. गिते सोमवारी बिटको कॉलेज भागात गेले असता ही घटना घडली. मॅग्नम हॉस्पिटल परिसरात संशयित जावई सुकदेव घुगे व शेजारी पंढरीनाथ घुगे यांनी त्यांना गाठून मुलीने कौटूंबिक न्यायालयात दाखल केलेली केस मागे घ्यावी या कारणातून वाद घालत शिवीगाळ केला. यावेळी संतप्त झालेल्या जावयासह त्याच्या साथीदाराने गिते यांना लोखंडी हातोड्याने मारहाण केली. या घटनेत सासरे गिते जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक मंगेश गोळे करीत आहेत.