नाशिक : महामार्गावरील उड्डाणपुलावर भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत ४० ते ४५ वयोगटातील अनोळखी व्यक्ती ठार झाल्याची घटना घडली आहे. काळया रंगाचा शर्ट परिधान केलेला अनोळखी इसम सोमवारी (दि.६) दुपारच्या सुमारास उड्डाणपूलावरून पायी जात होता. रस्ता ओलांडत असतांना नाशिककडून मुंबईच्या दिशेने भरधाव जाणा-या चारचाकी वाहनाने त्यास जोरदार धडक दिली. या घटनेत अंगावरून चाक केल्याने त्याचा जागीच चेंदामेंदा होवून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस नाईक यशवंत धनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास नाईक आंबेकर करीत आहेत.