नाशिक : अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल झाले आहे. या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणे तीन लाख लंपास केले. कामटवाडा शिवारात या दोन्ही घटना घडल्या. पहिली घटना धन्वंतरी मेडिकल कॉलेज पाठीमागील मटाले कॉलनीत घडली. प्रविण पोपट गुंजाळ (रा.साक्षी पार्क,देवरामनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शनिवारी अज्ञात चोरट्यांनी रो हाऊसच्या जीन्याच्या सहाय्याने टेरेसवर चढून उघड्या बेडरूममध्ये प्रवेश केला. यावेळी भामट्यांनी कपाटाला लावलेल्या चावीच्या माध्यमातून ड्रावरमधील सोन्याचा नेकलेस,सोनसाखळी,शॉट पोत कानातले व पँण्डल असलेली पोत असा सुमारे २ लाख २६ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. तर दुस-या घटनेची तक्रार रत्ना मधुकर शेजवळ (रा.सोहामणी सोसा.कामटवाडे) यांनी दिली आहे. शेजवळ कुटुंबिय २ ते ४ जून दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याची पोत व अंगठी असा सुमारे ६० हजाराचा ऐवज चोरून नेला. या दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलिस नाईक अतुल बनतोडे व देशमुख करीत आहेत.