लष्करी कॉर्टरमध्ये २८ वर्षीय विवाहीतेने केली आत्महत्या
नाशिक – २८ वर्षीय विवाहीतेने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना लष्करी कॉर्टरमध्ये घडली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रितू जितेंद्र कुमार (रा.उमराव विहार,दे.कॅम्प) असे मृत विवाहीतेचे नाव आहे. रितू कुमार यांनी रविवारी (दि.५) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पती जितेंद्र कुमार शर्मा यांनी तात्काळ मिल्ट्रीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉ.ओमकार पिचकेवार यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने ८२ वर्षीय वृध्दाचा मृत्यू
नाशिक – सिडकोतील जय बजरंग चौक परिसरात बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने ८२ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विठ्ठल तोताराम शिंपी असे मृत वृध्दाचे नाव आहे. शिंपी रविवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये चक्कर आल्याने पाय घसरून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास व कमरेस मार लागल्याने नातू हर्षल शिंपी यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास परदेशी करीत आहेत.