एटीएम कार्डाची आदलाबदल करीत एकाने २३ हजार रुपयाला घातला गंडा
नाशिक – द्वारका परिसरात स्टेट बॅकेच्या एटीएम केंद्रात पीन जनरेट करणाऱ्या महिलेला मदतीने बहाण्याने गंडवून एटीएम कार्डाची आदलाबदल करीत एकाने २३ हजार रुपये काढून घेतले. अर्चना श्रीराम रोकडे (वय ३५, नागजी चौक) या द्वारका चौकातील एटीएम केंद्रात नवीन पिन जनरेट करीत असतांना एका तीस ते चाळीस वर्षाच्या व्यक्तीने त्यांच्या कार्डाची आदलाबदल करीत खात्यातील २३ हजार १०० रुपये काढले. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारी वरुन भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गळ्यातील सोन्याची पोत ओरबडली
नाशिक – दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबडून नेल्याची घटना इंदिरानगर परिसरात ज्ञानेश्वरनगरला तुलसी हाईटस समोर शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. कुसुम मुन्ना लाल कश्यप या रात्री ज्ञानेश्वर नगर भागतून पायी जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील १० ग्रॅमची सोन्याची चेन आणि दहा ग्रॅमची सोन्याची पोत चोरट्यांनी ओरबरडून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल झाला आहे.