विना परवानगी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी सात जणा विरोधात गुन्हा दाखल
नाशिक – वडाळा रोड वर विना परवानगी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी सात जणा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दस्तगिर उस्मान शेख (अमरधाम रोड), रियाजउद्दीन फारुकउद्दीन बागवान (अजमेरी कॉलनी), फहिम शेख बागवानपुरा), नालिया बागवान, उजमा बागवान, गुलाम चांद शेख, फिरोज शेख नायकावीड पुरा अजमेरी मस्जिज) अशी संशयितांची नावे आहेत. शनिवारी (दि.४) दुपारी अडीचच्या सुमारास वडाळा रोड वरील जेएमसीटी स्कूल समोर पुर्वपरवानगी शिवाय संशयितांनी
आंदोलन करीत धरणे धरुन रास्ता रोको केल्या प्रकरणी पोलिस हवालदार ललित केदारे यांच्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजीवनगरला दीड लाखाची घरफोडी
नाशिक – सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास करुन चोरट्यांनी राजीवनगरला घरफोडी केली आहे. या घरफोडी प्रकरणी देवेंद्र राजाराम क्षीरसागर (वय ५२, राधे रेसीडेन्सी, भगवती चौक, राजीवनगर) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. क्षीरसागर यांच्या भगवती रेसीडेन्सी येथील प्लॅट क्रमांक ४ मधील बंद घराचा कधी तरी चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचे लॅच तोडून त्यानंतर लाकडी दरवाजाचे लोखंडी कुलूप तोडून बेडरुममध्ये दरवाजाचे लोखंडी कुलूप तोडून सुमारे दीड लाखांचे दागिणे लांबविले. त्यात वीस किलोची तिजोरी,१७ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, साडे ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, दहा ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट, चांदीचे नणे, हार दुर्वा, साडे सोळा लाखांच्या स्टेट बॅकेतील एफडी असा ऐवज चोरुन नेला.