स्विप्टने मागून धडक दिल्याने त्यात गंभीर जखमी झालेल्या गोरख पवार यांचे निधन
नाशिक – दोन दिवसांपूर्वी ट्रकला स्विप्टने मागून धडक दिल्याने त्यातील गंभीर जखमी असलेल्या गोरख बाबूलाल पवार (वय ३३, शिवदर्शन सोसायटी लामखेडे मळा) याचा काल सायंकाळी मृत्यु झाला. आडगाव शिवारात मुंबई आग्रा महामार्गावर हा अपघात झाला होता. या अपघातात नितीन सुखदेव पवार (वय ३८) , छाया नितीन पवार ( वय ३०), सोहम नितीन पवार (वय १२), विराज नितीन पवार (वय ७), रुपाली गोऱख पवार (वय २५) अनुष्का गोरख पवार (वय ६), उत्कर्ष गोरख पवार (वय ६) तारवालानगर हे जखमी आहे. दोन जूनला स्विफ्ट (एमएच १५ ईटी ३३०३) हिने सयाजी हॉटेल जवळ पुढे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघात झाला. आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे.
आई रागावल्याने बारा वर्षाचा मुलगा घरातून निघून गेला
नाशिक – सातपूरला सोमेश्वर कॉलनीत एबीपी कंपनीच्या मागील भागात आई रागावल्याने बारा वर्षाचा मुलगा घरातून निघून गेला. शनिवारी (दि ४) सकाळी साडे नउला त्याचा आईशी वाद झाला. त्याचा राग मनाथ धरुन दुपारी चारला घरातून तो बाहेर गेला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाला कुणीतरी पळवून
नेल्याचा गुन्हा दाखलझाला आहे.









