महामार्ग बसस्थानकात गर्दीची संधी साधत चोरट्यांनी कल्याण येथील महिलेच्या पर्समधील पाकिट केले लंपास
नाशिक : महामार्ग बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी कल्याण येथील महिलेच्या पर्समधील पाकिट लंपास केले. या पाकिटात रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५० हजाराचा ऐवज होता. या चोरीप्रकरणी कुसूम लक्ष्मण गावीत (४० रा.तिसगावनाका,कल्याण) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावित या नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. ३१ मे रोजी दुपारच्या सुमारास परतीच्या प्रवासासाठी त्या महामार्ग बसस्थानकात आल्या. त्यानंतर कसारा – नाशिक या बसमध्ये चढत असतांना ही घटना घडली. गर्दीत त्यांच्या गळयातील पर्सची चैन उघडून चोरट्यांनी पाकिट चोरून नेले. या पाकिटात दोन हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४७ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास जमादार आडके करीत आहेत.
चोरट्यांनी महिलेच्या पर्स चोरली
नाशिक : गोदाघाटावरील बाजारात भाजीपाला खरेदी करीत असतांना गर्दीत चोरट्यांनी महिलेच्या पर्स मधील रोकडसह मोबाईलवर लंपास केला. सोनल मयूर वालझाडे (रा.गणेश गार्डन द्वारका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत २८ हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळविला. वालझाडे या बुधवारी पतीसमवेत गोदाघाटावर भाजीपाला खरेदीसाठी करण्यासाठी गेल्या होत्या. बुधवार बाजारात त्या खरेदी करीत असतांना ही घडना घडली. भाजीपाला खरेदी करीत असतांना गर्दीची संधीसाधत चोरट्यांनी त्यांच्या गळय़ातील पर्स उघडून ३ हजाराच्या रोकडसह मोबाईल असा सुमारे २८ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.