पाण्याचा अंदाज न आल्याने गोदापात्रात तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू
नाशिक : गोदापात्रात उतरलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुलजार हमीद शहा (३५) असे मृत तरूणाचे नाव असून तो फिरस्ता आहे. गुरूवारी दुपारच्या सुमारास गुलजार शहा हा गाडगे महाराज पुलाजवळील नदी पात्रात आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी सलीम पठाण यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.
९० वर्षीय वृध्देचा मृत्यू
नाशिक : त्र्यंबकरोड भागात राहत्या घरात तोल जावून पडल्याने ९० वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला.चंद्रभागा चंद्रभान विधाते (रा.चंद्रभागा बिल्डींग,त्र्यंबकरोड) असे मृत वृध्देचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. चंद्रभागा विधाते या वृध्दा दि.२४ मे रोजी आपल्या राहत्या घरात तोल जावून पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डाव्या पायास गंभीर दुखापत झाल्याने सून विजया विधाते यांनी त्यांना तात्काळ वोक्हार्ट हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता उपचार सुरू असतांना गुरूवारी (दि.२) त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.