नाशिक – सासवडच्या महिलेला साडेबासष्ट लाख रुपयांना एका भामट्याने गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. शेअर मार्केटमध्ये दिलेली रक्कम गुंतवणूक न करता या महिलेचा विश्वासघातही केला. या फसवणूक प्रकरणी स्मिता बाळासाहेब शिवरकर (वय ३२, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन प्रसन्नकुमार नानाजी जगदाळे यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजेलली हकीकत अशी की, ओळखीचा फायदा घेऊन आरोपी जगदाळ याने फिर्यादी शिवरकर यांच्या आईच्या उपचाराची तरतूद होईल. त्यानंतर लग्न करून नवीन फ्लॅटमध्ये आईला सांभाळू, असे सांगून ही फसवणूकीला सुरुवात केली. आरीपीने नंतर तुम्ही शेअर मार्केटचे खाते सुरू केल्यास मोठा फायदा होईल असे सांगून आई व मावशी यांना खाते खोलण्यास भाग पाडले. त्यानंतर इतर नातेवाईकांच्या खात्यावर रक्कम डिपॉझिट करण्यास सांगितले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीत प्रत्यक्षात तोटा झालेला असताना देखील ५० लाख रुपयांचा नफा झाल्याची खोटी माहिती दिली. त्यानंतर १९ लाख ९७ हजार ६४४ रुपये त्याचे ब्रोकरेज म्हणून फिर्यादी महिलेकडून घेतले, तसेच डिसेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ यादरम्यानच्या कालावधीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी घेतलेली ३८ लाख ६ हजार ८५० रुपयांची रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतविली नाही. या रक्कमेतून फ्लॅट घेऊन तो फिर्यादी महिलेच्या नावावर करण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेकडून आरोपी जगदाळे याने वारंवार घेतलेली ४ लाख ४२ हजार रुपयांची रक्कम परस्पर हडपली. हा प्रकार १ ऑगस्ट २०१८ ते ३१ ऑगस्ट २०२१ दरम्यान शरणपूर रोड येथे घडला. या प्रकरणात आरोपीने फिर्यादी महिलेकडून वारंवार सुमारे ६२ लाख ४६ हजार ४९४ रुपयांची रक्कम घेऊन महिलेचा विश्वासघात करून तिची फसवणूक केल्यामुळे हा प्रकार पोलिस स्थानकात पोहचला.