नाशिक – महिला बचतगटाच्या मीटिंगसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. वृंदावननगर भागातील शिवकृपा स्वीटसमोरील इमारतीत बुधवार सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, बचतगटाच्या कामासाठी व मीटिंगसाठी वृंदावननगर भागातील शिवकृपा स्वीटसमोरील इमारतीतील चौथ्या मजल्यावर आले असता. या परिसरात राहणारा बंटी कोळी हा तिथे आला व त्याने धमकी दिली. तुला माहित आहे का मी कोण आहे, असे म्हणून त्याने शिवीगाळ करून इमारतीच्या खाली उतरण्यास सांगितले. तसेच छातीला हात लावून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत विनयभंग केला. तसेच बलात्कार करण्याची धमकी देऊन, पतीलाही मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान गुलाब शेख करीत आहेत.